बॉक्स ऑफिसवर राज करण्यास शाहरुख खान सज्ज, 2023 मध्ये आणतोय तब्बल एवढे चित्रपट..

बॉलीवूड

बॉक्स ऑफिसवर राज करण्यास शाहरुख खान सज्ज, 2023 मध्ये आणतोय तब्बल एवढे चित्रपट..


अभिनेता शाहरुख खान बऱ्याच काळापासून रुपेरी पडद्यापासून दूर आहे. तरीदेखील ताे आर माधवनच्या ‘रॉकेट्री: द नंबी इफेक्ट’मध्ये आणि रणबीर कपूरचा नुकताच रिलीज झालेला ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटात झळकला हाेता. मात्र, दाेन्ही चित्रपटात ताे पाहुण्या कलाकाराच्या रूपात दिसला. मुख्य अभिनेता म्हणून पडद्यावर त्याच्या पुनरागमनाची चाहते वाट पाहत आहेत. चित्रपटांव्यतिरिक्त शाहरुखबद्दल आणखी एक रंजक बातमी समोर येत आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार, शाहरुख खान लवकरच ओटीटी डेब्यू करणार आहे. 

मुख्य भूमिकेत असलेला शाहरुख खान (Shahrukh Khan) पुढच्या वर्षी धमाका करणार आहे. पुढच्या वर्षी शाहरुखचे तीन चित्रपट रिलीज हाेणार आहे. याव्यतिरिक्त शाहरुख खान डिजिटल प्लेटफॉर्मवर देखील डेब्यू करणार आहे. ही बातमी त्यांच्या चाहत्यासाठी कुठल्या मेजवाणीपेक्षा कमी नाही. रिपाेर्टनुसार, शाहरुख खान डिज्नी प्लस हॉटस्टारवरून डिजिटल डेब्यू करणार आहे.

 

शाहरुख खानने मागच्या वर्षी डिज्नी प्लस हॉटस्टारचा प्रोमो केला हाेता. रिपाेर्टनुसार शाहरुख डिज्नी प्लस हॉटस्टारसाठी एक वेबसीरीज करणार आहे. हा त्याचा डिजिटल डेब्यू असेल. असे म्हटले जात आहे की, ‘किंग खान’ने एक वेबसीरीज साईन केली आहे, जी या ओटीटी प्लॅटफॉर्मवर स्ट्रीम हाेईल. सध्या या वेबसीरीजबद्दल अधिक माहिती समोर आली नाहीये.

 

शाहरुख खान

गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये करण जाेहर (Karan Johar) याने शाहरुख खानचा प्रोमो व्हिडिओ शेअर करत म्हटले हाेते, “कधीच विचार केला नव्हता की, बाॅलिवूडचा बादशाह खान अशाप्रकारे उत्साह निर्माण करेल. आता मी काहीही बघायला तयार आहे.” यावर शाहरुखने ट्वीट करत लिहिले होते की, “हम्म…सिनेमा अजून बाकी आहे मित्रांनाे.”

 

शाहरुखच्या वर्कफ्रंटविषयी बाेलायचे झाले, तर, ताे लवकरच दीपिका पदुकाेण आणि जाॅन अब्राहमसाेबत ‘पठाण’ चित्रपटात दिसणार आहे. याव्यतिरिक्त त्याचा ‘जवान’ आणि ‘डंकी’ चित्रपट देखील येणार आहे.


हेही वाचा:

‘पुष्पा’ फेम अभिनेत्री रश्मिका मंदाना पँट न घालताच पडली घराबाहेर, खाली बसताच लोकांना दिसली तिची….

टिकटॉक इंडस्ट्रीला धक्का..! या प्रसिद्ध टिकटॉक स्टारचं अचानक झाल निधन, भाजपच्या तिकिटावर लढवली होती निवडणूक…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *