शाहरुख खानच्या बॉडीगार्डचा पगार आहे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांइतका, सुरक्षेशिवाय शाहरुखच्या बायकोलाही करतो पर्सनल कामात मदत..
बॉलिवूडचा बादशाह म्हटल्या जाणाऱ्या शाहरुख खानचे कुटुंब नेहमीचं कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत असते. मग त्यांची लाइफस्टाइल असो वा व्यवसायिक आयुष्य. शाहरुखची मुले देखील चर्चेचा विषय बनतात. तसेच येवढं मोठा स्टार म्हटलं की, त्याची सुरक्षा ही येतेच. अशा परिस्थितीत जेव्हा जेव्हा शाहरुखच्या सुरक्षेचा प्रश्न येतो तेव्हा त्याचा बॉडीगार्ड रवी सिंहचे नाव नक्कीच समोर येते.
शाहरुख खानच्या संरक्षणाची जबाबदारी गेल्या 10 वर्षांपासून रवी सिंगच्या हाती आहे. माध्यमांतील वृत्तानुसार, रवीचा पगार भारतातील कोणत्याही राज्याच्या मुख्यमंत्र्यांपेक्षा जास्त आहे. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, शाहरुख आपल्या बॉडीगार्डला वर्षाला सुमारे 2.7 कोटी इतका मोठा पगार देतो. मीडिया रिपोर्ट्सनुसार, किंग खान त्याचा बॉडीगार्ड रवीसोबत कुटुंबातील सदस्याप्रमाणे वागतो. याशिवाय इतरही अनेक जबाबदाऱ्या त्यांच्यावर सोपवण्यात आल्या आहेत.
शाहरुख खान व्यतिरिक्त रवी त्याचा मोठा मुलगा आर्यन खान आणि मुलगी सुहाना खान तसेच धाकटा मुलगा अबराम खान यांच्या संरक्षणाचे काम करतो. बॉलिवूडचा सर्वात श्रीमंत अभिनेता शाहरुख खान कुठेही गेला तरी त्याचा बॉडीगार्ड रवीला सर्व माहिती असते आणि तो त्याच्यासोबत सावलीसारखा राहतो.
शाहरुख खानचा अंगरक्षक रवी सिंग 2014 मध्ये पहिल्यांदा प्रकाश झोतात आला, जेव्हा त्याच्यावर एका महिलेला धक्काबुक्की केल्याचा आरोप झाला होता. खरं तर, एका कार्यक्रमादरम्यान प्रचंड गर्दी असताना रवीने शाहरुखचे संरक्षण करताना एका मुलीला धक्काबुक्की केली. यानंतर या प्रकरणाने मीडियात बरीच चर्चा केली. याशिवाय रवीला शाहरुखचा मुलगा आर्यन खानसोबतही अनेकदा पाहिले गेले आहे.
हेही वाचा: