ताजमहल: मुघल शासक शाहजहानने त्याची पत्नी मुमताज महलच्या स्मरणार्थ बांधलेल्या आग्रा येथे असलेल्या ताजमहालबद्दल सर्वांना माहिती आहे. पण अलीकडेच आणखी एक ताजमहाल चर्चेचा विषय बनला आहे जो एका मुलाने आपल्या आईच्या स्मरणार्थ बांधला आहे.
ही बातमी तामिळनाडूमधली आहे,जिथे मुलाने आईच्या मृत्युनंतर थेट तिच्यासाठी दुसरा ताजमहल उभा केला आहे.
ही बातमी तामिळनाडूच्या तिरुवरूर जिल्ह्यातील आहे, जिथे रहिवासी अमरुद्दीन शेख दाऊदने आपल्या आईच्या आठवणी जतन करण्यासाठी पांढरा संगमरवरी दुसरा ताजमहाल बांधला आहे.
ज्याप्रमाणे प्रत्येक मूल आपल्या आईवर प्रेम करते, त्याचप्रमाणे अमरुद्दीन शेख दाऊदचेही त्याची आई जेलनी बीवीवर खूप प्रेम होते. पण एका आजाराने त्याच्या आईचा जीव घेतला, त्यानंतर अमरुदीनला मोठा धक्का बसला कारण त्याची आईच त्याचे संपूर्ण जग होते.
आईच्या मृत्यूचा धक्का दूर करण्यासाठी आणि तिच्या आठवणी कायमस्वरूपी ठेवण्यासाठी त्याने काहीतरी वेगळे करण्याचा निर्णय घेतला. 2022 मध्ये त्याच्या आईचे निधन झाल्यानंतर अमरुदिनने ठरवले की तो त्याच्या आईला त्याच्याच जमिनीमध्ये पुरणार आहे. आणि तिथे तिच्या स्मरणार्थ काहीतरी बांधणार. या निर्णयात त्यांच्या कुटुंबीयांनीही त्यांना साथ दिली. आणि अश्या रीतीने त्याने आपल्या आईच्या स्मरणार्थ दुसरा ताजमहल उभा केला.
अमरुदीन म्हणतो की,
त्याच्या वडिलांचा रस्ता अपघातात मृत्यू झाल्यानंतर त्याच्या आईने सर्व मुलांना एकट्याने वाढवले, जे सोपे नव्हते. त्याच्या धर्मात दुसऱ्या लग्नाची परंपरा असूनही त्याच्या आईने दुसरं लग्न केलं नाही. अमरुदिन म्हणतात की त्याची आई प्रेम आणि शक्तीचे प्रतीक होती.
म्हणूनच तिच्या आठवणी कायम आमच्या सोबत राहाव्या म्हणून मी हा निर्णय घेतला असल्याचे त्याने म्हटले आहे. एकंदरीत आपल्या आईवरील या प्रेमामुळे तो सध्या सर्वत्र चर्चेत आहे.. ई मुलाचे हे प्रेम सध्या सोशल मिडीयावर देखील चर्चेचा विषय बनला आहे.
हेही वाचा:
- Shahid Kapoor and kareena kapoor affair: या कारणामुळे अभिनेता शाहीद कपूर आणि करीना कपूर यांची प्रेमकहाणी होऊ शकली नाही पूर्ण, बंद खोलीमध्ये एकमेकांच्या वर बसून करत होते असे काम…!
Success Story of Chai Sutta Bar: दोन मुलांनी सोबत येऊन मुलींच्या होस्टेलबाहेर सुरु केलेला चहाचा व्यवसाय आज करोडोंची उलाढाल करतोय.