चरमसुख वेबसिरीज : मनोरंजन उद्योगातून एक हृदयद्रावक बातमी समोर आली आहे. ॲडल्ट वेब सीरिजचा भाग असलेली अभिनेत्री आणि मॉडेल नूर मलाबिका दास हिने आत्महत्या केल्याचे वृत्त आहे. मुंबईतील लोखंडवाला भागात असलेल्या फ्लॅटमध्ये मलाबिका मृतावस्थेत आढळून आली आहे. रिपोर्टनुसार, अभिनेत्रीने पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली आहे. पोलिसांनी अभिनेत्रीचा कुजलेला मृतदेह तिच्या घरातून जप्त केला असून पुढील तपास सुरू केला आहे. अभिनेत्रीच्या मृत्यूने संपूर्ण इंडस्ट्रीला धक्का बसला आहे.
नूर मलाबिका एडल्ट वेब सिरीज चरमसुख करून प्रसिद्ध झाली होती.
नूर मलाबिका दास ही आसामची रहिवासी आहे. तिने बॉलिवूड अभिनेत्री काजोलसोबत ‘द ट्रायल’ या वेब सीरिजमध्ये काम केले आहे. याशिवाय तिने उल्लू ॲपवरील अनेक प्रौढ मालिकांमध्ये काम केले आहे, ज्यात तीखी चटणी,चरम सुख, देखी-उंडेखी, वॉकमन, सिस्कियां, पलंग तोड आणि बॅकरोड हुसला यासारख्या अनेक मालिकांचा समावेश आहे, या मालिका तरुणांमध्ये प्रसिद्ध आहेत.
नूर मलाबिका दासच्या मृत्यूची बातमी आल्यापासून लोकांच्या मनात हा प्रश्न उपस्थित होत आहे की, तिचा अचानक मृत्यू कसा झाला? रिपोर्टनुसार, फ्लॅटमधून दुर्गंधी येत असल्याची माहिती शेजाऱ्यांनी पोलिसांना दिली होती. माहिती मिळताच पोलीस अभिनेत्रीच्या घरी पोहोचले आणि दरवाजा तोडून नूरच्या फ्लॅटमध्ये प्रवेश केला असता अभिनेत्रीचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळून आली.
तपासादरम्यान नूरचा मोबाईल फोन, औषधे आणि एक डायरी जप्त करण्यात आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, नूर मलाबिका दोन आठवड्यांपूर्वीच मुंबईतील तिच्या घरी परतली होती. अशा परिस्थितीत तिची अचानक झालेली आत्महत्या कोणालाच पचत नाहीये. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.
- चाणक्यनीती नुसार अश्या घरांमधील कुटुंब राहते सर्वांत सुखी, अश्या घरांमध्ये स्त्रिया असतात सुखी..
- व्यावसायिक उपाय: व्यवसायात होतोय सारखा तोटा तर हे उपाय नक्की करून पहा, व्यवसायातील अडचणीवर आहे रामबाण उपाय..!