IPL 2024 Final, KKR vs SRH: आज या कारणांमुळे नाही होऊ शकणार अंतिम मुकाबला, उद्यावर ढकलू शकते आयपीएलची शेवटची लढत समोर आले कारण..

IPL 2024 Final: इंडियन प्रीमियर लीग 2024 चा निर्णायक सामना आज कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद (KKR vs SRH) यांच्यात होणार आहे. ही विजेतेपदाची लढत चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर होणार आहे. KKR ने शेवटचे IPL चे विजेतेपद 2014 मध्ये जिंकले होते, तर SRH 2016 मध्ये चॅम्पियन बनले होते. अशा स्थितीत आता दोन्ही संघ प्रदीर्घ कालावधीनंतर ट्रॉफी उंचावण्याचा प्रयत्न करतील. मात्र, अंतिम सामना आजऐवजी उद्या होऊ शकतो. गेल्या मोसमातही असेच घडले होते.

IPL 2024 Final, KKR vs SRH: आज या कारणांमुळे नाही होऊ शकणार अंतिम मुकाबला, उद्यावर ढकलू शकते आयपीएलची शेवटची लढत समोर आले कारण..

IPL 2024 Final, KKR vs SRH: या कारणामुळे आजचा सामना होऊ शकतो रद्द..

खर तर, शनिवारी रात्री चेन्नईत पाऊस पडला. आजही अंतिम सामन्यादरम्यान पाऊस पडला तर, सामना राखीव दिवशी खेळवला जाऊ शकतो. आणि चेन्नईमध्ये आज रात्री पाऊस पाडण्याची शक्यता 75% आहे,  IPL 2024 च्या फायनलसाठी 27 मे हा राखीव दिवस म्हणून ठेवण्यात आला आहे. अशा स्थितीत विजेतेपदाचा सामना आजऐवजी उद्या खेळवला जाऊ शकतो.

उद्या चेन्नईत पाऊस पडला तरी सामना प्रत्येकी किमान 5 षटकांचा व्हावा यासाठी प्रयत्न केले जातील. पावसामुळे हे शक्य झाले नाही तर सुपर ओव्हरमधून विजेता निवडला जाईल. जर मुसळधार पाऊस असेल आणि सुपर ओव्हर शक्य नसेल तर गुणतालिकेतील अव्वल संघ विजेता ठरेल.

IPL 2024 Final, KKR vs SRH: आज या कारणांमुळे नाही होऊ शकणार अंतिम मुकाबला, उद्यावर ढकलू शकते आयपीएलची शेवटची लढत समोर आले कारण..

श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील कोलकाता नाईट रायडर्सने लीग टप्प्यातील 14 पैकी 9 सामने जिंकले. संघ 3 मध्ये पराभूत झाला होता आणि 2 सामने अनिर्णित होते. संघ 20 गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थानावर होता. अशा स्थितीत सामना झाला नाही तर केकेआर या मोसमाचा विजेता ठरेल. याआधीही कोलकाताने दोनदा आयपीएलचे विजेतेपद पटकावले आहे. गौतम गंभीरच्या नेतृत्वाखाली केकेआरने 2012 आणि 2014 मध्ये ट्रॉफी जिंकली होती.


हेही वाचा:

Leave a Comment