KKR vs RR: आयपीएल 2024 मध्ये आतापर्यंत 31 सामने झाले आहेत. 16 एप्रिल रोजी राजस्थान रॉयल्स आणि केकेआर यांच्यात झालेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने दोन विकेट राखून एक ऐतिहासिक सामना आपल्या नावे केला. प्रथम फलंदाजी करताना केकेआर ने 20 षटकात सहभाग 223 धावा केल्या. प्रतिउत्तरात राजस्थानने दोन विकेट राखून विजय मिळवला. या सामन्यात जबरदस्त फलंदाजी करून सुनील नरेन याने क्रिकेट प्रेमींची मने जिंकली. केकेआरच्या या सलामीच्या फलंदाजाने 200च्या स्ट्राईक रेटने तुफानी शतक ठोकत इतिहास रचला.
KKR vs RR: सुनील नारायणने रचला इतिहास
सुनील नारायणने अवघ्या 49 चेंडू सेंचुरी पूर्ण केली. त्याने 56 चेंडूचा सामना करत 109 धावा केल्या. यात तेरा चौकार आणि सहा षटकारांचा समावेश होता. यादरम्यान सुनील नरेन ने चार मोठे विक्रम आपल्या नावे केले.
सुनील नरेन आयपीएलच्या इतिहासात केकेआर कडून खेळताना शतक ठोकणारा तिसरा खेळाडू बनला आहे. यापूर्वी असा विक्रम ब्रॅंडल मॅक्युलम यांना 2008 मध्ये केला होता तर व्यंकटेश अय्यरने 2023 मध्ये शतक ठोकले होते.
सुनील नरेन आयपीएलच्या इतिहासात हॅट्रिक विकेट आणि शतक ठोकणारा तो तिसरा खेळाडू बनला आहे. त्याच्यापूर्वी रोहित शर्मा आणि शेन वॉटसन यांनी हा कारनामा केला होता.
सुनील नरेन या लीग मधील एकमेव खेळाडू आहे, ज्याने या लीग मध्ये पाच विकेट घेतले आणि फलंदाजी करताना 200 पेक्षा अधिकच्या स्ट्राईकरेटने शतक ठोकले.
सुनील नरेन आयपीएलच्या इतिहासात शतक ठोकणारा पन्नासावा खेळाडू बनला आहे त्याने राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या सामन्यात 49 चेंडू शतक पूर्ण केले 109 धावा काढून तो बाद झाला.
आधिक वाचा-
–भारतातील गरीब कुटुंबातील मुलगी बनली डॉक्टर! आज दुबईत 3600 कोटी रुपयांच्या फर्मची आहे मालकीण