Mohmmad Shami Fitness update: भारतात सध्या आयपीएल 2024 स्पर्धेचा फिवर सुरू आहे. यंदाच्या हंगामामध्ये भारताचा स्टार वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी हा दुखापतीमुळे खेळू शकला नाही. आयपीएल 2024 च्या या स्पर्धेदरम्यान त्याच्या फिटनेस विषयी एक मोठी अपडेट समोर आली आहे. स्पीड मास्टर मोहम्मद शमी हा विश्वचषक स्पर्धेतील ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या अंतिम सामन्यांमध्ये खेळताना दिसून आला होता.
मोहम्मद शमीने भारतात झालेल्या 2023 वनडे विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज होता. या स्पर्धेनंतर तो दुखापतीमुळे मैदानात परतला नाही. दुखापतीमुळे दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड विरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेत देखील तो खेळू शकला नाही. दुखापतीमुळे तो क्रिकेटपासून दूर आहे. पायाला झालेल्या दुखापतीसह तो विश्वचषक खेळत होता. तो मैदानावर कधी परतणार याचीच उत्सुकता सर्व क्रिकेट प्रेमींना लागून राहिली होती. आता त्याच्या प्रकृती विषयीसंपूर्ण माहिती समोर आली आहे.
Mohmmad Shami Fitness update: शमीने सोशल मिडीयावर दिली माहिती.
शमीने त्याच्या ट्विटर हँडल वरून आपल्या प्रकृती विषयी अपडेट दिली आहे. शमीने त्याचा फोटो शेअर करत कॅप्शन मध्ये लिहिले की,
मी मैदानात पुनरागमन करण्यासाठी खूपच भुकेलेला आहे. रस्ता अवघड असला तरी ध्येय मात्र सार्थक आहे. फोटोमध्ये शमी येलो कलर चा टी-शर्ट आणि शॉर्ट्स घातलेला दिसून येतो. तसेच काठीचा आधार घेत उभा आहे.
मोहम्मद शमी याने 26 फेब्रुवारी रोजी पायावर शस्त्रक्रिया करून घेतली होती. त्यामुळे भारतीय क्रिकेट बोर्डाने मोहम्मद शमी आयपीएल 2024 मध्ये खेळणार नसल्याची माहिती दिली होती. भारताचा हा स्टार गोलंदाज जून महिन्यात होणाऱ्या t20 विश्वचषक स्पर्धेतला देखील मुकणार आहे. 33 वर्षीय मोहम्मद शमी मैदानात कधी होणार आगमन करणार याची निश्चित माहिती मिळाली नसली तरी तो सप्टेंबर महिन्यात बांगलादेश विरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेमध्ये पुनरागमन करू शकतो.
मोहम्मद शमी भारतात झालेल्या वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरला होता. सुरुवातीच्या पहिल्या चार सामन्यात त्याला संघ व्यवस्थापनाने संधी दिली नव्हती. 5व्या सामन्यापासून त्याला भारतीय संघात खेळण्याची संधी मिळाली त्याने विश्वचषक स्पर्धेतील सात सामन्यात 24 विकेट घेतले होते. या विश्वचषक स्पर्धेत त्याने सेमी फायनल मध्ये न्युझीलँड विरुद्ध खेळताना 57 धावा देत सात गडी बाद करण्याचा पराक्रम देखील केला होता.
मोहम्मद शमी हा आयपीएल मध्ये गुजरात टायटन्स संघाचे प्रतिनिधित्व करतो. शमीच्या या फोटोवर गुजरात टायटन्सने देखील प्रतिक्रिया दिली आहे. गुजरात टायटल्स ने पोस्टमध्ये लिहिले की, “पहिल्यापेक्षा अधिक कणखर होऊन मैदानात पुनरागमन कर शमीभाय!” (Mohmmad Shami Fitness update)