कसोटीमध्ये सर्वाधिक विकेट घेणारे भारतीय गोलंदाज: अलीकडेच फिरकीपटू ‘आर अश्विन’ कपिल देवला मागे टाकून कसोटीमधील विकेट्सच्या बाबतीत देशासाठी सर्वाधिक बळी घेणारादुसरा गोलंदाज बनला आहे. अश्विन अशी कामगिरी करणारा दुसरा भारतीय गोलंदाज ठरला आहे. अश्विनच्या समोर आता फक्त भारतीय संघाचा माजी फिरकीपटू अनिल कुंबळे आहे. कुंबळेने कसोटीमध्ये तबल 619 गडी बाद केले आहेत, जे आवरच्या खेळाडूंपैकी सर्वांत जास्त आहेत.
आजच्या या लेखामध्ये आम्ही तुम्हाला अश्याच 5 गोलंदाजांची माहिती देणार आहोत ज्यांनी भारतीय संघाकडून खेळतांना कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक गडी बाद केले आहेत.
अनिल कुंबळे (Anil Kumble) :६१९
अनिल कुंबळेने 1990 ते 2008 दरम्यान 132 कसोटी सामन्यांमध्ये 619 विकेट्स घेतल्या होत्या. कुंबळेची यादरम्यान 29.65 च्या सरासरीने विकेट्स घेतल्या आहेत, तर त्याने 35 वेळा एका डावात पाच किंवा त्याहून अधिक विकेट्स आणि एका सामन्यात आठ वेळा दहा किंवा त्याहून अधिक विकेट घेतल्या आहेत. कुंबळेचा हा विक्रम आजूनही तसाच आहे..
आर अश्विन (Ravichndra Ashwin): 486
2011 मध्ये कसोटी पदार्पण करणाऱ्या आर अश्विनने आतापर्यंत 94 कसोटी सामन्यांमध्ये टीम इंडियाचे प्रतिनिधित्व केले असून, 94 कसोटीत 23.61 च्या सरासरीने 486 विकेट्स घेतल्या आहेत. यादरम्यान, त्याने34 वेळा एका डावात पाच किंवा त्याहून अधिक बळी आणि 10 वेळा सामन्यात दहा किंवा त्याहून अधिक बळी घेण्याची कामगिरी केली आहे. वेस्ट इंडीज विरुद्धच्या दुसऱ्या डावात 7 गडी बाद करत त्याने हा दर्जा मिळवला.
कपिल देव (Kapil Dev) :४३४
भारताकडून कसोटी विकेट घेण्याच्या बाबतीत महान अष्टपैलू कपिल देव दुसऱ्या स्थानावर आहे. त्याने 1978 ते 1994 पर्यंत 131 कसोटी सामन्यांमध्ये टीम इंडियाचे प्रतिनिधित्व केले असून 29.64 च्या सरासरीने 434 विकेट घेतल्या. कपिल हा भारताचा सर्वात यशस्वी वेगवान गोलंदाज आहे, ज्याने 23 वेळा एका डावात पाच किंवा त्याहून अधिक विकेट्स आणि एका सामन्यात दोनदा दहा किंवा अधिक विकेट्स घेतल्या आहेत.
केवळ 10 षटकात संपला होता हा कसोटी सामना; क्रिकेटच्या इतिहासातातील आजवरचा सर्वांत लहान कसोटी सामना.. फलंदाज झाले होते हैराण..
हरभजन सिंग (Harbhajan Singh)४१७
टीम इंडियासाठी कसोटी क्रिकेटमध्ये विकेट घेण्याच्या बाबतीत फिरकीपटू हरभजन सिंग तिसऱ्या क्रमांकावर आहे. टर्बनेटर या टोपणनावाने ओळखल्या जाणाऱ्या या गोलंदाजाने 1998 ते 2015 दरम्यान 103 कसोटी सामन्यांमध्ये 32.47 च्या सरासरीने 417 विकेट्स घेतल्या आहेत. यादरम्यान त्याने 25 डावांत पाच किंवा त्याहून अधिक बळी आणि पाच वेळा दहा किंवा त्याहून अधिक बळी घेण्याचा पराक्रम केला आहे.
झहीर खान (Zahir Khan) 311
खब्बू वेगवान गोलंदाज झहीर खान टीम इंडियासाठी कसोटी विकेट घेण्याच्या बाबतीत चौथ्या क्रमांकावर आहे. त्याने 2000 ते 2014 दरम्यान 92 कसोटी सामने खेळले आणि 32.94 च्या सरासरीने 311 बळी घेतले. पाच किंवा त्याहून अधिक डाव 11 वेळा आणि एकदा सामन्यात दहा विकेट्ससह, झहीर भारतासाठी सर्वाधिक कसोटी बळी घेणारा दुसरा गोलंदाज आहे.
आधिक वाचा-
–AUS vs PAK: वॉर्नर झूकेगा नहीं रुकेगा नहीं! धडाकेबाज शतकी खेळी करत गिलख्रिस्टला टाकले पाठीमागे..
–‘या’ बाॅलिवूड अभिनेत्रींचे झालेले MMS लीक; कतरिना कैफ तर लाजून झालेली लाल; एकीने तर ओलांडल्या सर्व मर्यादा