जसप्रीत बुमराह याची गणती वन-डे क्रिकेट मधील डेथ ओव्हरचा सर्वात सर्वोत्तम गोलंदाज म्हणून केली जाते. पण पाकिस्तानचा कर्णधार बाबर आजम याचे मत वेगळे आहे. बाबर याला टी-20 सामन्यामध्ये शेवटचे विसावे षटक टाकण्यासाठी कोणाला निवडणार नसीम शहा की जसप्रीत बुमराह? यावर बाबरने नसीमला निवडले.
बाबर आजम याला विचारण्यात आले की, t20 क्रिकेट मधील शेवटचे षटक आहे सामना जिंकायचा असेल आणि शेवटच्या षटकात दहा धावांचा बचाव करायचा असेल तर दोन विकल्प आपल्यासमोर आहेत. जसप्रीत बुमराह आणि नसीम शहा तर आपण गोलंदाजी करण्यासाठी कोणत्या खेळाडूकडे चेंडू सोपवाल? यावर बाबर याने नसीम याला निवडले आणि त्याचे कारण ही सांगितले.
21 वर्षीय नसीम पाकिस्तान संघाकडून तीनही फॉरमॅटमध्ये क्रिकेट खेळला आहे. त्याने आतापर्यंत 17 टेस्ट, 32 वनडे आणि पंधरा टी-20 सामने खेळले आहेत. नुकतेच पाकिस्तान सुपर लीग मधील अंतिम सामन्यात इस्लामाबाद युनायटेड संघाच्या विजयात त्याने महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्याने या संघाकडून खेळताना लीगमध्ये सर्वाधिक 15 विकेट घेतले होते.
या युवा गोलंदाजाचे कौतुक करताना बाबर आजमने म्हणाला की, पाकिस्तान मध्ये नसीम शाह सारखे प्रतिभा शोधूनच क्वचित मिळत असते. अशी प्रतिभा भेटत नाही मागील वर्षी सप्टेंबर मध्ये झालेल्या आशिया कप स्पर्धेमध्ये त्याला दुखापत झाली होती. त्यामुळे तो वनडे विश्वचषक 201 स्पर्धेतून बाहेर पडला. या दुखापतीमुळे त्याला शस्त्रक्रिया सामोरे जावे लागले होते.
नसीम शहाच्या पुनरागमनावर बाबरने प्रतिक्रिया देताना म्हणाला की, सर्वप्रथम मला नसीम विषय खूपच आनंद आहे. ज्याप्रमाणे त्याने दुखापतीनंतर क्रिकेटमध्ये पुनरा आगमन केले आहे. त्याच्याकडे अविश्वसनीय कौशल्य आहे. असा कौशल्य पूर्ण खेळाडू पाकिस्तान मध्ये क्वचितच आहे. नसीम प्रत्येक गोष्टीत अनुभव घेत आहे.
बाबर आजम याला पुन्हा एकदा पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने वनडे आणि टी-20 संघाचा कर्णधार बनवण्यात आला आहे. कर्णधार म्हणून आता खेळताना त्यांना न्यूझीलंड विरुद्धच्या मालिकेला सामोरे जावे लागणार आहे. पाकिस्तानचा संघ 18 एप्रिल पासून पाच t20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. यासाठी पीसीबीने 29 जणांचा संघ निवडला असून ते सर्व खेळाडू पाकिस्तानच्या आर्मीसोबत फिटनेसची तयारी करत आहेत.
आधिक वाचा-
–भारतातील गरीब कुटुंबातील मुलगी बनली डॉक्टर! आज दुबईत 3600 कोटी रुपयांच्या फर्मची आहे मालकीण
–भारतातील गरीब कुटुंबातील मुलगी बनली डॉक्टर! आज दुबईत 3600 कोटी रुपयांच्या फर्मची आहे मालकीण