Shahrukh Khan Watch Price: बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खान सध्या त्याच्या टीम केकेआरचा विजय साजरा करत आहे. आयपीएलचा अंतिम सामना जिंकून केकेआरने तिसऱ्यांदा ट्रॉफी जिंकली आहे. हा अविस्मरणीय सामना अनेकांनी पाहिला असेल.
पण शाहरुख जेव्हा आयपीएल फायनलमध्ये आनंद साजरा करत लोकांना शुभेच्छा देत मैदानावर पोहोचला तेव्हा त्याचे घड्याळ (Shahrukh Khan Watch Price) तुमच्या लक्षात आले का? या खास प्रसंगी शाहरुख खानने हातात मौल्यवान घड्याळ घातले होते. या महागड्या घड्याळाची किंमत ((Shahrukh Khan Watch Price) केकेआरच्या अनेक खेळाडूंना दिल्या जाणाऱ्या पगारापेक्षा कितीतरी जास्त आहे.
शाहरुख खानने आयपीएल फायनलमध्ये जे घड्याळ हातात घातले होते ते सामान्य घड्याळ नसून ‘रिचर्ड मिल’ ब्रँडचे करोडो किमतीचे घड्याळ आहे. शाहरुख खानने घातलेले घड्याळ हे रिचर्ड मिलचे अनोखे घड्याळ होते आणि त्याची आवृत्तीही मर्यादित आहे, ज्याची मालकी जगातील काही मोठ्या व्यक्तींकडे आहे, अशीही चर्चा आहे.
या घड्याळाचे पूर्ण नाव RM 11 – 03 असे सांगितले जात आहे आणि जगात याच्या फक्त 500 आवृत्त्या आहेत. या घड्याळात फारशी विविधता नाही कारण ते फक्त टोन्यु आकारात येते. जे खूप हलके वजन आणि स्पोर्टी लुक देते. या घड्याळाच्या किंमतीबद्दल बोलायचे झाल्यास, या घड्याळाची सध्याची किंमत 4,98,97,471 रुपये आहे.
जगातील सर्वात महागड्या घड्याळांमध्ये गणले जाणारे हे घड्याळ परिधान करून शाहरुख खानने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. पण , जगातील सर्वात महागड्या घड्याळांच्या यादीत या घड्याळांचा समावेश आहे असे नाही. घड्याळात अनेक आश्चर्यकारक वैशिष्ट्ये आहेत ज्यामुळे हे घड्याळ खूपच महाग आहे.
शाहरुख खानचे हे अनोखे घड्याळ टायटॅनियम, तांबे, टीपीटी आणि सोन्याचे बनलेले आहे. हे कॉम्पॅक्ट आणि हलके वजनाचे घड्याळ आहे, जे स्पोर्टी आणि क्लासिक लुक देते. यासह, यात स्वयंचलित फ्लायबॅक क्रोनोग्राफ मूव्हमेंट आहे जे या स्मार्ट घड्याळाला सुमारे 50 तास चालण्याची शक्ती देते.
किंमत एवढी की, एका घड्याळात चार पोर्श खरेदी करता येतील (Shahrukh Khan Watch Price)
2018 मध्ये जिनेव्हा इंटरनॅशनल मोटर शोमध्ये हे घड्याळ सादर करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. त्या काळात, हे घड्याळ रिचर्ड मिल आणि मॅकलरेन ऑटोमोटिव्ह यांनी संयुक्तपणे लॉन्च केले होते. या घड्याळाची सध्याची किंमत सुमारे 5 कोटी रुपये आहे आणि सध्या भारतात पोर्श कारची किंमत 1.36 कोटी ते 1.80 कोटी रुपये आहे. अशा परिस्थितीत, शाहरुख खानच्या या एका घड्याळाने 3 ते 4 पोर्श कार सहज खरेदी करता येतील.
==
– आयपीएलच्या इतिहासात ऑरेंज कॅप मिळवणारा हा आहे पहिला विदेशी खेळाडू!
– एकाच मैदानावर सर्वाधिक धावा करणारी हे आहेत खेळाडू! वाचा विराटला कोणते मैदान ठरले लकी