शनी जयंती विशेष: हिंदू धर्मात सर्व देवी-देवतांच्या पूजेचे स्वतःचे महत्त्व आहे. प्रत्येक दिवस कोणत्या ना कोणत्या देवतेला वाहिलेला असतो. शनिवार आणि शनि जयंतीच्या दिवशी शनिदेवाची पूजा करून उपाय केल्यास कुंडलीतील शनिची स्थिती मजबूत होते.
शनी जयंती ला करा हे विशेष काम.
शनिदेवाला समर्पित शनि जयंती जेष्ठ महिन्यातील अमावास्येला साजरी केली जाते. या दिवशी शनिदेवाची भक्तीभावाने पूजा केल्याने आनंद मिळतो. त्याच बरोबर जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत शनि अशुभ फल देत असेल तर शनि जयंतीच्या दिवशी शनि आरती आणि शनि स्तोत्राचे पठण केल्यास शुभ फळ मिळते.
शनि जयंतीच्या दिवशी तुम्हालाही शनिदेवाला प्रसन्न करायचे असेल आणि अशुभ परिणाम टाळायचे असतील तर शनि जयंतीच्या दिवशी शनिदेवाची पूजा केल्यानंतर शनि स्तोत्र आणि शनि आरतीचे पठण करा.
त्यामुळे जीवनाचा मार्ग सुकर होतो. तसेच शनिदेव सर्वांच्या मनोकामना पूर्ण करतात. हिंदू कॅलेंडरनुसार, यावेळी शनि जयंती ज्येष्ठ महिन्याच्या अमावास्येला साजरी केली जाईल. यावेळी 6 जून रोजी शनी जयंती साजरी केली जाणार आहे.
(अस्वीकरण: येथे दिलेली माहिती सामान्य समजुती आणि माहितीवर आधारित आहे.)