पुण्यातल्या श्रीधर चिल्लाल यांनी १९५२ साला पासून आतापर्यंत आपली नखं वाढवली. १७ नोव्हेंबर २०१४ ला सगळ्यांत लांब नखांसाठी गिनीज बूकमध्ये सुद्धा त्यांच्या नावाची नोंद झाली.त्याच दरम्यान त्यांनी रोजच्या कामात अडचणी येऊ नये म्हणून आपल्या उजव्या हाताची नखं कापली. पण डाव्या हाताची तशीच ठेवली ती गेल्या काही दिवसांत काढली.
श्रीधर चिल्लाल यांनी कापले नाहीत 66 वर्ष आपल्या हाताची नखे..
त्यांच्या नखांना अमेरिकेतल्या न्यूयॉर्कमधल्या रिप्लीज बिलिव्ह इट ऑर नॉट म्युझियम मध्ये ठेवलं आहे. त्यांनी आपल्या हाताची नखे का वाढवली ह्याची कहाणी हि अशी…
श्रीधर चिल्लाल पुण्यात शिकत असताना ९ व्या इयत्तेत असतानाची हि कहाणी आहे. वर्गाबाहेर मित्रांसोबत खेळताना खेळताखेळता चुकून शिक्षकांशी धडक झाली. शिक्षक आणि श्रीधर दोघे जमिनीवर पडले. त्यात त्या शिक्षकांनी वाढवलेल्या हाताच्या बोटाची नखे तुटली.
त्या शिक्षकांना त्याचे खूप वाईट वाटले आणि त्यांनी श्रीधरला चोप दिला. त्यानंतर श्रीधरयांनी असा निर्णयघेतला कि मी माझी नखे कधीही कापणार नाही. आणि तब्बल ६६ वर्षं लोटल्यानंतर त्यांनी हि नखे कापली.
दीर्घकाळ नखं न कापल्यानं आणि नखांच्या वजनानं श्रीधर यांच्या डाव्या हाताला मोठ्या अडचणी आल्या आहेत. त्यांना त्यांच्या हाताच्या बोटांची हालचाल करता येत नाही. चक्क लोखंड कापण्यासाठी वापरण्यात येणारहत्याराने त्यांची नखे कापण्यात आली.
आता ते खूप म्हातारे झाले असल्याने त्यांना त्यांच्या हाताच्या नखांचे वजनही नीट पेलता येत नव्हते.
न्यूयॉर्क मधल्या “रिप्लीज बिलिव्ह इट ऑर नॉट” म्युझियममनं त्यांना त्यांच्या नखांचा सांभाळ करण्याचं आश्वासन दिलं आहे. त्यामुळेच त्यांनी हा निर्णय घेतला असं ते सांगतात. गिनीज बूकच्या मते शेवटच्या वेळी जेव्हा त्यांच्या नखाचं माप घेतलं तेव्हा त्याची लांबी 909.6 सेमी होती.
श्रीधर चिल्लाल यांची नखं कापण्याच्या या कार्यक्रमासाठी खास करुन त्यांना भारतातून अमेरिकेला बोलावण्यात आले होते.
1952 मध्ये श्रीधर यांच्याकडून एका शिक्षकाचं लांब नख चुकून तुटलं. त्यामुळे त्यांना शिक्षकाचा ओरडा खावा लागला होता. ‘
तुला तुटलेल्या नखाची किंमत कधीच समजणार नाही, कारण तुझी कशासोबतही बांधिलकी नाही.
‘ त्यामुळे श्रीधर यांनी आव्हान म्हणून स्वत:ची नखं वाढवायचा निर्णय घेतला.
श्रीधर चिल्लाल सांगतात की, न्यूयॉर्क मधल्या रिप्लीज बिलिव्ह इट ऑर नॉट म्युझियममनं त्यांना त्यांच्या नखांचा सांभाळ करण्याचं आश्वासन दिलं आहे.
श्रीधर सांगतात, “मला विश्वास आहे की नखं कापण्याचा निर्णय योग्य होता. लोक तिथं जाऊन बघू शकतील.”
हेही वाचा: