सुषमा स्वराज

दाउदच्या धामक्यांपासून बॉलीवूडला वाचवण्याचे श्रेय आजही ‘सुषमा स्वराज’ यांना दिले जाते, ते या किस्स्यामुळेच.

बॉलीवूड

दाउदच्या धामक्यांपासून बॉलीवूडला वाचवण्याचे श्रेय आजही ‘सुषमा स्वराज’ यांना दिले जाते, ते या किस्स्यामुलेच.

दरवर्षी बॉलीवूड Bollywood मध्ये शेकडो चित्रपट बनतात. यापैकी किती चित्रपट सुपरहिट होतात? काही मोजके चित्रपट सोडले तर बरेच चित्रपट फक्त खर्च डब्यात जातात. तर काही चित्रपट केवळ खर्च वसूल करतात. असंच काही इतर प्रादेशिक सिनेमा जगात देखील बघायला मिळते.

सिनेमाचे ग्लॅमर आणि झगमगती दुनिया पाहून अनेक उद्योजक निर्माते होण्यास तयार होतात. त्याचबरोबर निर्माता होऊन अगदी सहज पद्धतीने कमीत कमी वेळात प्रकाशझोतात येण्याची संधी कोणालाच दवडू वाटत नाही. मात्र या क्षेत्रातील आर्थिक अडचणी समजून न घेता केवळ दलालांद्वारे फसवले गेल्याने हे उत्साही निर्माते अनेक वेळा अडचणीत येण्याचे चित्र आपण पाहिलेच आहे.

Sushma Swaraj Death Anniversary: An Able BJP Politician Whose Abilities  Were Stifled Under Modi Government

खास करून 80-90 च्या दशकात असे हजारो निर्माते दिवाळखोर होताना बॉलीवूड ने पाहिले आहेत. प्रसंगी बघता हे निर्माते केवळ काही विशिष्ट पद्धतीने द्वारे सिनेमा निर्मितीसाठी पैसे गोळा करत असत. पहिली अतिशय पारदर्शक पद्धत म्हणजे बाजारातून किंवा सावकार लोकांकडून मोठ्या व्याज दराने पैसा गोळा करणे.

हे व्याज तब्बल 36 ते 40 टक्के असायचे. त्यामुळे निर्मात्यांची आर्थिक स्थिती अधिकच बिकट होत असे. आता दुसरा मार्ग म्हणजे राजकीय नेते आणि व्यावसायिकांचा काळा पैसा, जो मुख्य व्यवहारात नसतो. आणि त्याहून अत्यंत धोकादायक तिसरा स्त्रोत, जो झटपट होता मात्र यामध्ये जीवाचा धोका होता.

अंडरवर्ल्ड दाऊदची टीम सिनेमा निर्मितीमध्ये पैसे गुंतवण्यात अग्रेसर होती. डॉन दाऊदच्या पब्लिकला आधीच बॉलीवूड आणि अभिनेता अभिनेत्रींची भुरळ पडली होती. दुसरं म्हणजे यातून मिळणारा पैसाही चांगला होता. डॉन कडून घेतलेले पैसे वेळेवर परत केले गेले नाहीत तर त्याचे परिणाम वाईट होतील.

हे समजून अनेक निर्माते कोणताही मार्ग स्वीकारून वेळेवर पैसे परत करायचे. 90च्या दशकात अनेक अभिनेते निर्माते दिग्दर्शक दाऊद कडून दिलेल्या पार्ट्यांमध्ये वर्तमानपत्राच्या पेज थ्री वर झळकायचे. शारजा मधील क्रिकेट सामन्यादरम्यान तर बॉलीवूडचे अनेक अभिनेते दाऊद शेजारीच बसलेले आपण पाहिले आहेत.

सुषमा स्वराज

बॉलीवूडकर त्यावेळी दाऊदच्या दहशत आणि उपकाराच्या ओझ्याखाली दबली होते. बॉलिवूडची आर्थिक स्थिती दाऊदच्या हातात आहे. हे समजल्यानंतर अनेक भाई लोकांच्या आशा वाढल्या. अशातूनच मग टी-सिरीजच्या गुलशन कुमारची निर्घृण हत्या करण्यात आली.

राकेश रोशन आणि राजीव राय यांच्यासारख्या आघाडीच्या निर्मात्यांवर देखील प्राणघात हल्ले झाले. अंडरवर्ल्ड वर बॉलीवूडचे अवलंबित्व होते. बॉलीवूडकर हे सर्व आपल्या आनंदाने करत आहेत असं नव्हतं. मात्र त्यांच्यापुढे इतर पर्याय नव्हता. या दलदलीतून बाहेर काढण्यासाठी बॉलिवूडला एका मसीहाची गरज होती.

मात्र थेट दाऊदला भिडण्याची ताकद कोणामध्येच नव्हती. दाऊदला भिडणे म्हणजे स्वतःच्या जीवासोबत खेळणे, हे सर्वांना ठाऊक होते. त्यामुळे दाऊदचे तक्त हलवण्याची हिंमत त्यावेळी कोणातच नव्हती. मात्र ही हिम्मत दाखवली एका धाडसी महिलेने!

वाजपेयी सरकारमधील माहिती आणि प्रसारण मंत्री सुषमा स्वराज यांनी बॉलिवूडला दाऊदच्या चंगूल मधून बाहेर काढण्यामध्ये मोठी भूमिका निभावली होती. सुष्मा स्वराज यांनी रातोरात बॉलिवूडची परिस्थितीच पालटली. आपल्या देशामध्ये सिनेमाचे वेड अनेकांना आहे.

 

मात्र या सिनेमाच्या पंढरी वरती कुख्यात डॉन दाऊदचे एकहाती वर्चस्व प्रस्थापित झालं होतं. बॉलीवूडचा अनभिशिक्त सम्राट होऊन बसलेल्या दाऊदच्या साम्राज्याला सुषमा स्वराज यांनी सुरुंग लावला .सुषमा स्वराज यांच्या धाडसाचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे.

त्या काळात त्यांना जिवे मारण्याच्या धमक्या देखील आल्या. मात्र या सर्व गोष्टींची त्यांनी परवा केली नाही. सुषमा स्वराज यांनी वाजपेयींना पुढे करून एक अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतला. त्यांनी भारतीय सिनेमाला उद्योगाचा दर्जा मिळवून दिला. त्यामुळे बँका आणि इतर वित्तीय संस्थाकडून आर्थिक मदत मिळवण्याचा मार्ग चित्रपटांसाठी खुला झाला.

पूर्वी त्या स्थितीच्या अभावामुळे बॉलीवूडला चित्रपटांसाठी लागणारा पैसा उभा करण्यासाठी काळा पैसा, अंडरवर्ल्ड यासारख्या स्तोत्रांकडे पहाव लागत होतं. मात्र उद्योगाचा दर्जा मिळाल्यानंतर हे चित्र पूर्णपणे पालटले. वाजपेयी सरकारने घेतलेल्या चांगल्या निर्णयांपैकी एक म्हणून त्याचा उल्लेख करावाच लागेल.

आर्थिक मदत सुरू होतात स्टुडिओ संकल्पना सिनेमा निर्मितीत आली. परदेशी गुंतवणूक सुरू झाली आणि भारतीय सिनेमाला चांगले दिवस आले. सिनेमा जगताचा अभ्यास करणाऱ्यांचा असं मत आहे की, 2000 सालानंतर अंडरवर्ल्ड आणि बॉलीवूडचे एकमेकांवर अवलंबून राहण्याचे प्रमाण खूप कमी झाले. बॉलिवूड निर्मात्यांवर होणारे हल्ले पूर्णपणे थांबले. दोन दशकांच्या भीतीनंतर सिनेजगताच्या पंढरीने म्हणजेच बॉलीवूडने मोकळा श्वास घेतला होता.


हेही वाचा:

घरातील 45 लाख रोकड घेऊन रिक्षाचालाकासोबत पळाली बड्या उद्योजकाची पत्नी, नवऱ्याला कळताच झालं असं कांड की…

नवरदेव मंडपात दाखल नवरीने नवरदेवास पाहताच दिला लग्नाला नकार, कारण वाचून सरकेल पायाखालची जमीन..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *