T20 World Cup 2024: केवळ 8 महिन्यातच संपले ‘या’ दिग्गज खेळाडूचे करिअर, संघ विश्वचषकातून बाहेर पडताच जाहीर केली तडकाफडकी निवृत्ती..

T20 World Cup 2024: आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेसाठी आता सुपर 8 फेरीसाठी 8 संघ निश्चित झाले आहेत. बांगलादेश सुपर 8 मध्ये पोहचणारी शेवटची टीम ठरली. त्यानंतर आता साखळी फेरीतील शेवटचे काही सामने बाकी आहेत. या स्पर्धेत काही उलटफेर पाहायला मिळाले.

या विश्वचषकात पाकिस्तान आणि श्रीलंका यासारख्या विश्व विजेत्या संघांना सुपर 8 मध्येही पोहचता आलं नाही. तर दुसऱ्या बाजूला यजमान आणि इतर संघांच्या तुलनेत नवख्या असलेल्या यूएसएने पहिल्याच झटक्यात सुपर 8 चं तिकीट मिळवलं. या दरम्यान अनेक घडामोडी पाहायला मिळाल्या. अनेक खेळाडूंनी निवृत्तीची घोषणा केली.

T20 World Cup 2024: केवळ 8 महिन्यातच संपले 'या' दिग्गज खेळाडूचे करिअर, संघ विश्वचषकातून बाहेर पडताच जाहीर केली तडकाफडकी निवृत्ती..

 

न्यूझीलंडचा अनुभवी ट्रेंट बोल्ट याने हा माझा शेवटचा टी 20 वर्ल्ड कप असल्याचं म्हटलं. तर 16 जून रोजी नामिबियाचा ऑलराउंडर डेव्हिड विसे याने टीम टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेतून बाहेर झाल्याने निवृत्ती जाहीर केली. आता त्यात आणखी एका खेळाडूची भर पडली आहे.

T20 World Cup 2024:  ट्रेंट बोल्टने घेतली अंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती

नेदरलँड्स क्रिकेट टीम कायम उलटउेर करण्यासाठी चर्चेत असते. या स्पर्धेतही नेदरलँड्सने दक्षिण आफ्रिकेसारख्या संघाला टफ फाईट दिली. नेदरलँड्सला 4 पैकी नेपाळ विरुद्धचा एकमेव सामना जिंकता आला. मात्र नेदरलँड्सला सुपर 8 मध्ये पोहचता आलं नाही. नेदरलँड्सचं आव्हान साखळी फेरीतच संपुष्टात आलं. त्यामुळे नेदरलँड्सचा फलंदाज सायब्रँड एंजेलब्रेक्ट याने निवृत्ती जाहीर केली. सायब्रँड एंजेलब्रेक्टने अवघ्या 9 महिन्यातच नेदरलँड्सची साथ सोडली. त्यामुळे एकच खळबळही उडाली आहे.

T20 World Cup 2024 मधून बाहेर पडताच नेदरलँड्सच्या अष्टपैलू खेळाडूचा क्रिकेटला रामराम

सायब्रँड एंजेलब्रेक्ट याने अंडर 19 वर्ल्ड कप स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेचं प्रतिनिधित्व केलंय. एंजेलब्रेक्ट नेदरलँड्ससाठीची कारकीर्द औटघटकेची ठरली. एंजेलब्रेक्ट फक्त 9 महिनेच नेदरलँड्सकडून खेळला. एंजेलब्रेक्ट गेल्या वनडे वर्ल्ड कप 2023 राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये 9 ऑक्टोबर रोजी न्यूझीलंड विरुद्ध पदार्पण केलं. एंजेलब्रेक्टने नेदरलँड्सचं 12 वनडे आणि टी 20 सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व केलं. एंजेलब्रेक्टने या दोन्ही फॉर्मेटमध्ये एकूण 685 धावा केल्या. तसेच 5 विकेट्सही घेतल्या.

टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेसाठी नेदरलँड्स क्रिकेट टीम :

स्कॉट एडवर्ड्स (कॅप्टन), आर्यन दत्त, बास डी लीडे, डेनियल डोरम, फ्रेड क्लासेन, कायल क्लेन, लोगान वॅन बीक, मैक्स ओ’डोड, माइकल लेविट, पॉल वॅन मीकेरेन, साइब्रांड एंगेलब्रेक्ट, तेजा निदामानुरु, टिम प्रिंगल , विक्रम सिंह आणि वेस्ले बर्रेसी.


हेही वाचा:

Leave a Comment