T20 World Cup 2024: ‘सारखा भारताकडून हरतो..’ आता बाबरने कर्णधारपद सोडून द्यावे, पाकिस्तानच्या दिग्गज खेळाडूने बाबरला दिला घरचा आहेर.

T20 World Cup 2024: पाकिस्तान क्रिकेट संघाची अवस्था विश्वचषकात पुन्हा एकदा बिकट होताना दिसत आहे. आतापर्यंत संघाने स्पर्धेत दोन सामने खेळले असून बाबरच्या संघाला दोन्ही सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले आहे. त्यानंतर आता संघाचा कर्णधार बाबर आझमवर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

भारताकडून पराभव झाल्यावर पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू स्वत: बाबर आझमला कर्णधारपद सोडण्यास सांगत आहे. बाबरला चांगली कामगिरी करायची असेल तर ,त्याने पाकिस्तान संघाचे कर्णधारपद सोडले पाहिजे, असे काही माजी क्रिकेटपटूंचे मत आहे.नक्की कोण आहे हा माजी पाकिस्तानी खेळाडू? जाणून घेऊया सविस्तर..

T20 World Cup 2024:शोएब मलिकने बाबरच्या कर्णधारपदावर प्रश्न उपस्थित केले.

या विश्वचषकात आतापर्यंत बाबर आझम फलंदाजीत विशेष काही करू शकलेला नाही. त्याच्या कर्णधारपदावर आणि फलंदाजीच्या स्ट्राईक रेटवरही अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. भारताकडून झालेल्या पराभवानंतर पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब मलिक याने लाईव्ह चॅनलवर सांगितले की, बाबरला कर्णधार बनू नये, असे मी खूप दिवसांपासून म्हणत आहे. तू चांगला आणि दर्जेदार फलंदाज आहेस आणि जेव्हा तुझ्याकडे कर्णधारपदाची जबाबदारी नसेल तेव्हाच तुझा वर्ग बाहेर पडेल. कर्णधारपदापासून दूर राहिल्यास चांगला खेळ कराल.

२०२४ च्या विश्वचषकापूर्वी कर्णधार बनवण्यात आला होता.

T20 World Cup 2024: 'सारखा भारताकडून हरतो..' आता बाबरने कर्णधारपद सोडून द्यावे, पाकिस्तानच्या दिग्गज खेळाडूने बाबरला दिला घरचा आहेर.

बाबर आझमला पुन्हा पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार बनवण्यात आले आहे. एकदिवसीय विश्वचषक 2023 मध्ये पाकिस्तान संघाची कामगिरी अत्यंत खराब होती, त्यानंतर बाबरने संघाचे कर्णधारपद सोडले. बाबरनंतर शाहीन आफ्रिदीला टी-20 संघाचा कर्णधार बनवण्यात आले.

त्याच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानी संघाने मालिका खेळली आणि त्यात पराभवाला सामोरे जावे लागले. टी-20 विश्वचषकापूर्वी बाबर आझमला पुन्हा एकदा संघाचा कर्णधार बनवण्यात आले. मात्र, बाबरला पुन्हा संघाचा कर्णधार करण्यात आल्याने बराच गदारोळ झाला होता.


हेही वाचा:

Leave a Comment