टिक टॉक स्टार म्हणून अत्यंत कमी वेळेमध्ये स्वत: ची एक वेगळी ओळख निर्माण करणारा बीडमधील संतोष मुंडे याचा आज दुर्देवी मृत्यू झालाय. संतोषच्या निधनाची बातमी कळताच सर्वत्र हळहळ व्यक्त केली जातंय. संतोषसोबतच बाबुराव मुंडे याचाही मृत्यू झाला आहे. आज संध्याकाळी (13 डिसेंबर 2022) रोजी संतोष आणि बाबुराव हे दोघे डीपीचा फ्यूज बदलण्यासाठी गेले असता अचानक विद्युत पुरवठा सुरू झाल्याने यांचा जागीच मृत्यू झालायं.
संतोष मुंडे हा फेमस टिक टॉक स्टार असून याच्या निधनाची बातमी कळताच अनेकांनी दु:ख व्यक्त केलंय. बीडच्या धारूर तालुक्यातील भोगलवाडी येथे ही घटना घडलीये. संतोष आणि बाबुराव यांचे जागीच निधन झाले.
हा अपघात नसून घातपात असल्याची एक चर्चा ग्रामस्थांमध्ये सुरू आहे. कारण अगदी कमी काळामध्ये संतोष याने टिक टॉकच्या माध्यमातून एक खास ओळख तयार केली आहे.
हेही वाचा:
हिरव्या रंगाच्या ड्रेसमध्ये अभिनेत्री ‘जान्हवी कपूर’ने लावली आग, मुद्दामहून ब्रा न घालता आली बाहेर आणि लोकांचे केले टा….