आपला भारत देश हा एक कृषिप्रधान देश म्हणून ओळखला जातो. भारतातील 90 टक्के लोक शेती करून आपली उपजीविका करतात शेतीबरोबरच वेगवेगळे शेती पूरक व्यवसाय करून भारतातील शेतकरी आपली उपजीविका करत आहेत. आपल्या देशातील बऱ्याच लोकांची अशी समजूत आहे की शेती करून काही फायदा नाही त्यापेक्षा नोकरी करावी असे वेगवेगळे प्रश्न लोकांच्या मनात येतात. तर मित्रांनो आज आम्ही तुम्हाला या लेखात अश्या तरुणा बद्दल सांगणार आहे की उच्चशिक्षित असून सुद्धा शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करून मोठ्या प्रमाणावर फायदा कमवला आहे.
गडचिरोली जिल्ह्यात राहणाऱ्या तसेच वकिली पेशा असणाऱ्या 38 वर्षीय संजय गंडाटे यांनी इंटरनेट वरून तसेच यूट्यूब वरून माहिती मिळवून मोत्यांची शेती करण्याचा निर्णय घेतला. परंतु वाटते तेवढी ही गोष्ट सोपी न्हवती. या साठी प्रत्यशिक माहिती सुद्धा खूप गरजेची होती म्हणून संजय गंडाटे यांनी गडचिरोली कृषी विद्यापीठाकडे धाव घेतली आणि माहिती मिळवायला सुरुवात केली.
हे ही वाचा:-अंबानी कुटुंब करतय 600 एकरात आंब्याची शेती आणि निर्यातीमधून करतय करोडो रुपयांची उलाढाल, जाणून घ्या सविस्तर.
अपयश यशाची पहिली पायरी:-
शेती करण्यासाठी फक्त ज्ञान असणे गरजेचे नसते त्याचबरोबर कष्ट आणि मेहनत खूप महत्वाची असते. संजय गंडाटे हा तरुण पूर्णपणे तयारी ने शेती मध्ये उतरला परंतु अनुभव नसल्यामुळे मोत्याची शेती करताना त्याला अनेक अडचणी आल्या. सुरुवातीला 2 प्रयत्नामध्ये संजय ला अपयश आले परंतु खचून न जाता संजय ने तिसऱ्या प्रयत्नात मोत्यांची शेती फुलवली. परंतु त्या वेळी मोत्यांची चोरी झाली त्यामुळे हाताघाशाला आलेला घास चोरट्यांनी चोरून नेला.
मोती शेती मधून यशस्वी उत्पन्न:-
तीन अपयश उराशी घालत शेवटी संजय ने यशस्वी मोत्यांची शेती करून दाखवली आतापर्यंत संजय ने 30 पेक्षा जास्त शेतकरी वर्गाला प्रशिक्षण दिले आहे शिवाय प्रत्येक हंगामाला संजय मोत्यांच्या शेतीतून 10 ते 12 लाख एवढे उत्पन्न अगदी आरामात काढतो.
एका शिंपल्यातून किती उत्पन्न मिळते:-
सर्वसाधारण पने एका शिंपल्यात दोन मोती असतात. त्याचा एकूण खर्च हा 70 रूपये एवढं असतो. त्यातून म्हणजे एका शिंपल्यातून कमीत कमी 3 ते 5 हजारापर्यंत उत्पन्न मिळतं. एका हंगामात जवळपास 5 हजार शिंपले टॅंकमध्ये टाकतात त्यामधून आरामात 15 लाखांपर्यंत उत्पन्न मिळू शकते.
मोत्यांची बाजारपेठ आणि मागणी:-
मोत्यांचा वापर मोठ्या प्रमाणात दागिने बनवण्यासाठी केला जातो. त्यामुळे बाजारात मोत्याना मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. आपल्या देशात सुरत, अहमदाबाद, हैदराबाद, मुंबई या शहरांमध्ये मोत्यांच्या मोठ्या बाजारपेठा आहेत.