या अभिनेत्यासाठी करिष्मा कपूर आणि रवीना टंडन यांच्यात झाली होती हाणामारी, चक्क एकमेकांचे ओढले होते केस..!

रवीना टंडन: बॉलीवूड स्टार्समध्ये वाद आणि मारामारी सामान्य आहे. दररोज स्टार्स एकमेकांवर कुरघोडी करताना दिसतात. यातील काही प्रश्न ताबडतोब सुटतात, काही वर्षानुवर्षे सुरू राहतात आणि काही एकमेकांचे शत्रूही बनतात. या स्टार्सना एकमेकांच्या चेहऱ्याकडे पाहायलाही आवडत नाही. अभिनेत्री रवीना टंडन आणि करिश्मा कपूर यांच्यातही अशीच लढत झाली आहे. ही मारामारी अशी होती की दोघांमध्ये हाणामारी झाली आणि एकमेकांचे केसही ओढले. काय आहे संपूर्ण कहाणी आम्ही तुम्हाला सांगतो.

या अभिनेत्यासाठी करिष्मा कपूर आणि रवीन टंडन यांच्यात झाली होती हाणामारी, चक्क एकमेकांचे ओढले होते केस..!

रवीना टंडन आणि करिश्माच्या कॅटफाईटचा एवढ्या वर्षानंतर केला खुलासा,

रवीना टंडन आणि करिश्मा कपूर यांची नावे 90 च्या दशकातील टॉप अभिनेत्रींमध्ये गणली जातात. या दोघांनी अंदाज अपना अपना, रक्षक आणि आतिश या चित्रपटात एकत्र काम केले आहे. यादरम्यान दोघांमध्ये अशी भांडणे झाली की त्यांनी एकमेकांचे केसही ओढले. 2007 मध्ये कॉफी विथ करणच्या एका एपिसोडदरम्यान, कोरिओग्राफर फराह खानने करिश्मा कपूर आणि रवीना टंडन यांच्यातील या कॅटफाइटचा खुलासा केला होता. फराहने सांगितले की, आतिश फील द फायर या चित्रपटाच्या गाण्याच्या सीक्वेन्सदरम्यान रवीना आणि करिश्मा एकमेकांशी भिडले होते. दोघांनीही एकमेकांना केसांच्या विगांनी मारहाण केली.

रवीना टंडन-करिश्माने एकमेकांचे केस ओढले होते.

रवीना टंडन आणि करिश्मा कपूर यांनी 1994 मध्ये रिलीज झालेल्या आतिश चित्रपटात एकत्र काम केले होते. फराह खान चित्रपटातील एका गाण्याचे कोरिओग्राफी करत होती. या गाण्यात रवीना आणि करिश्मा होत्या. शूटिंगदरम्यान दोघींमध्ये भांडण झाले होते. यात चक्क एकमेकिंचे केस देखील ओढले होते..

या अभिनेत्यासाठी करिष्मा कपूर आणि रवीन टंडन यांच्यात झाली होती हाणामारी, चक्क एकमेकांचे ओढले होते केस..!

या अभिनेत्यामुळे झाले होते रवीना टंडन आणि करिश्मा कपूर यांच्यामध्ये भांडण !

वृत्तांवर विश्वास ठेवला तर ,या भांडणाचे कारण दुसरे कोणी नसून अभिनेता अजय देवगण होता. खरं तर, एकेकाळी करिश्मा आणि रवीना दोघीही अजयच्या प्रेमात पडल्या होत्या. त्यावेळी अजय देवगण रवीना टंडनसोबत रिलेशनशिपमध्ये होता. नंतर अशा बातम्या येऊ लागल्या की अजयने रवीनासोबत ब्रेकअप केले आहे आणि आता तो करिश्माच्या जवळ आला आहे. या गोष्टीमुळे रवीना नाराज झाली आणि ती रागाने लाल झाली. अशात रवीना आणि करिश्मा समोरासमोर आल्यावर दोघींनी एकमेकांशी भांडण केले आणि एकमेकांचे केसही ओढले होते. (actress karishna kapoor & ravina tandan fight for ajay devgan)


आधिक वाचा-
भारतातील गरीब कुटुंबातील मुलगी बनली डॉक्टर! आज दुबईत 3600 कोटी रुपयांच्या फर्मची आहे मालकीण

Leave a Comment