Benefits of Morning Sex: आजच्या जगातही, लिंग आणि लैंगिक आरोग्याविषयी चर्चा असामान्य आणि अयोग्य म्हणून पाहिली जाते. परंतु अनेक वर्षांपासून, एखाद्याचे संपूर्ण आरोग्य राखण्यात सेक्सने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. आयुर्वेदानुसार, सेक्स हा केवळ आनंद आणि पुनरुत्पादनापुरता मर्यादित नाही, तर तो आयुर्वेदाच्या तीन स्तंभांपैकी एक आहे, जो आपल्या शरीराचे पोषण आणि रक्षण करू शकतो आणि संतुलन राखण्यास मदत करतो.
सकाळी उठल्यानंतर प्रत्येक व्यक्तीची स्वतःची सकाळची दिनचर्या असते. काहीजण आपल्या सकाळची सुरुवात एक कप गरम चहाने करतात, काही मॉर्निंग वॉक करतात, काही योगा किंवा व्यायाम करतात. पण सकाळी सेक्स करायचा मुड होत असेल तर ते आरोग्यासाठी चांगले आहे. त्याचे आरोग्य फायदे लक्षात घेऊन सेक्सची वेळ सहज बदलता येते. बॉडी ब्लॉकनुसार पाहिल्यास असे दिसून येईल की स्त्री आणि पुरुष दोघांमध्ये सकाळच्या वेळी हार्मोन्सचे प्रमाण जास्त असते. यामध्ये टेस्टोस्टेरॉन सारख्या सेक्स हार्मोन्सचाही समावेश होतो. म्हणूनच सकाळी सेक्स करणे आरोग्यासाठी फायदेशीर आणि आनंददायी आहे.
त्वरित मूड बूस्ट होतो
यात काही शंका नाही की सेक्स आनंदी हार्मोन्स सोडण्यास मदत करते, ज्यामुळे तुमचा मूड प्रसन्न होतो. सकाळच्या संभोगानंतर व्यक्तीला मानसिकदृष्ट्या हलके वाटते आणि मन शांत होते. तज्ञांच्या सल्ल्यानुसार सकाळच्या संभोगानंतर, ऑक्सिटोसिन आणि डोपामाइन सारख्या आनंदी हार्मोन्सच्या उत्सर्जनामुळे दिवसभर अधिक आराम मिळतो आणि फ्रेश वाटते.
istock
मॉर्निंग सेक्स इम्युनिटीसाठीही फायदेशीर
स्त्रीरोग तज्ज्ञांच्या मते, सकाळी सेक्स केल्याने शरीरात इम्युनोग्लोबुलिन ए (आयजीए) चे उत्पादन वाढण्यास मदत होते. येथे IgA म्हणजे इम्युनोग्लोबुलिन ए, जो एक प्रतिपिंड रोगप्रतिकारक कार्यामध्ये महत्वाची भूमिका बजावते. म्हणून, सकाळच्या सेक्सचा स्पष्ट हेतू रोग प्रतिकारशक्ती वाढवणे अशा होवू शकतो.
istock
स्मरणशक्ती सुधारते
मॉर्निंग सेक्समुळे मेंदू सक्रिय होण्यास मदत होते, कारण यामुळे शरीरातील हार्मोन्सचा प्रवाह सुरळीत राहतो. सकाळच्या सेक्समुळे मेंदू दिवसभर शांत आणि तंदुरुस्त राहतो, स्ट्रेस कमी होतो आणि कामात अॅक्टिव्ह राहते, असे तज्ञांनी सांगितले.
istock
मॉर्निंग सेक्समुळे वर्कआउटसारखे फायदे
मॉर्निंग सेक्स हा मध्यम व्यायामाइतकाच फायदेशीर आहे. यामुळे दिवसाची सुरुवात सकारात्मक उर्जेने होते, तसेच स्ट्रेचिंगमुळे दिवसभर शरीर आणि मन प्रसन्न राहते. 1000 प्रौढांचा समावेश असलेल्या 2018 च्या संशोधनात, 54 टक्के लोकांचा असा विश्वास आहे की सकाळच्या सेक्समुळे शरीर दिवसभर उत्साही आणि फ्रेश राहते.
लैंगिक चिंता दूर करू शकते
लैंगिक संबंधातील समस्या खूप सामान्य आहेत. त्यामुळे लठ्ठपणा, उंची आणि लिंगाचा आकार, स्तनांचा आकार, ताठरपणा नसणे अशा शरीराच्या सर्व समस्यांनी प्रत्येकजण त्रस्त आहे. अशा समस्या नंतर गंभीर मानसिक समस्या ठरू शकतात. कोणतेही कपल्स सकाळी जास्त संवेदनशील असल्याने यावेळी शारीरिक संबंधाने जवळीक वाढवता येते आणि सर्व लैंगिक समस्या दूर होण्याची शक्यता असते.
कामवासना सुधारण्यास मदत
रात्री चांगली झोप घेतल्यानंतर, फ्रेश मॉर्निंसाठी सकाळी सेक्स केला पाहिजे असा सल्ला तज्ञ देतात. अशावेळी सकाळचा सेक्स शरीराला चांगल्या प्रमाणात सेक्स हार्मोन्स तयार करण्यास सक्षम करतो आणि आनंदही देतो. सेक्समुळे ऑक्सिटोसिन आणि डोपामाइन नावाचे हार्मोन्स बाहेर पडतात. त्यामुळे कामवासना वाढते.
रोमॅंटिक फिलिंग
आपल्या जोडीदाराच्या मिठीत मॉर्निंग होणे ही आतापर्यंतची सर्वात रोमॅंटिक फिलिंग असू शकते. तुमच्या जोडीदाराला सकाळी किस केल्याने ते नंतर सेक्समध्ये बदलू शकते हे आश्चर्यकारक पण खरी भावना आहे. मॉर्निंग सेक्समुळे तुमच्या वैवाहिक जीवनाची संपूर्ण गतिशीलता बदलू शकते, खासकरून जर तुमच्या जीवनात काही काळापासून गोष्टी नीरस झाल्या असतील जेव्हा तुम्ही सकाळी उठता तेव्हा तुम्हाला उत्तेजित आणि लैंगिकदृष्ट्या तणाव जाणवू शकतो. म्हणून सकाळच्या सेक्समुळे तुमच्या वैवाहिक जीवनात अत्यंत आवश्यक बदल होऊ शकतो.