या एका नाटकामुळे भाऊ कदम ला आपल्यातील विनोदी कलेची जाणीव झाली पानटपरी सोडून करू लागला कॉमेडी आज आहे मराठीतील एकदम प्रसिद्ध कॉमेडीयन..

नवनवीन मराठी मनोरंजन

या एका नाटकामुळे भाऊ कदम ला आपल्यातील विनोदी कलेची जाणीव झाली पानटपरी सोडून करू लागला कॉमेडी आज आहे मराठीतील एकदम प्रसिद्ध कॉमेडीयन..


चला हवा येऊ द्या या झी मराठीवरील कार्यक्रम  महाराष्ट्रात  जवळपास सगळीकडे फेमस आहे.याच कार्यक्रमातील एक महत्वाचा सदस्य म्हणजे डोंबिवलीचा भालचंद्र कदम म्हणजे आपला सर्वांचा लाडका भाऊ कदम.

“चला हवा येऊ द्या ” या मालिकेतून  संपूर्ण महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेले विनोदवीर म्हणजे भाऊ कदम .आपल्या विनोदी शैलीच्या जीवावर कित्येकांना हसून वेड करणारा हा अभिनेता. भाऊ कदम यांचा एक साधा पानवाला ते एक प्रसिद्ध अभिनेता हा आजवरचा प्रवास हा अत्यंत प्रेरणादायक आहे.

भाऊ कदम याचे बालपण मुंबईतील वडाळा परिसरातील बीपीटी क्वॉटर्समध्ये गेले आहे. वडाळा येथील ज्ञानेश्वर विद्यालयातून त्यांनी आपले शालेय शिक्षण पूर्ण केले. बालपणापासूनच ते लाजाळू आणि शांत स्वभावाचे आहेत.

वडिलांच्या अकाली निधनानंतर वडाळ्याहून ते आपल्या कुटुंबासोबत डोंबिवलीत स्थायिक झाले. भाऊ, घर खर्चासाठी मतदार नावे नोंदणीचे काम करत होते, पण त्यात भागत नसल्याने त्यांनी भावाच्या साथीने पानाची टपरी सुरू केली.

फु बाई फु मध्ये आपल्या स्कीटमधूण त्यांनी कितेकदा  संपूर्ण महाराष्ट्राला पोटभर हसवले होते.भाऊ कदम यांनी आतापर्यंत जवळजवळ ५०० हून अधिक नाटकांच्या प्रयोगात काम केले आहे. आपल्या उत्कृष्ट अभिनयाच्या जोरावर त्यांनी फु बाई फु च्या सहाव्या पर्वात  विजेते होण्याचा मान सुद्धा मिळवला होता.

भाऊ कदम यांच्या आयुष्यात  एक वेळ अशी होती  कि, सतत चीत्रपटात ण मिळणारी  संधी  यामुळे भाऊ कदम यांनी  अभिनय  क्षेत्र सोडण्याचा निर्णय घेतला होता , परंतु विजय निकम यांनी याच वेळी त्यांना “जाऊ तिथ खाऊ” या नाटकात मुख्य भूमिका दिली आणि हेच नाटक त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणार ठरल. याच नाटकाच्या प्रयोगानंतर भाऊ कदम यांनी मागे वळून पहिले नाही उत्क्रष्ट अभिनयाच्या जोरावर त्यांची कारकीर्द बहरतच गेली.

भाऊ कदम यांनी अनेक गाजलेल्या मराठी चित्रपटांमध्ये काम  केले. तसेच आपल्या अभिनयाचा ठसा हिंदी चित्रपटात सुद्धा उमटवण्यास ते यशस्वी झाले आहेत.

मराठी  चित्रपटांपैकी टाईमपास २, टाईमपास, सांगतो ऐका, मिस मॅच, पुणे विरूद्ध बिहार, नारबाची वाडी, कोकणस्थ, चांदी, मस्त चाललंय आमचं, बाळकडू असे काही यशस्वी चित्रपटही आहेत ज्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका निभावली आहे.

भाऊ कदम

भाऊ कदम यांना लहानपणापासूनच अभिनयाची  आवड होती. हीच आवड  त्यांनी आजोपर्यंत जोपासत  निलेश साबळे सोबत चला हवा येऊ द्या पर्यंत आपली मजल मारली आहे.  भाऊ कदम यांनी बर्याच  मालिकाट सुद्धा काम केल आहे. एकंदरीत  रील  लाइफ अभिनेता म्हणू भाऊ कदम यांचा प्रवास  प्रेरणादायक आहे.

एक विनोदवीर अभिनेता  म्हणून काम करत असताना भाऊ कदम हे  नेहमीच तत्पर असतात.अस म्हटल जात कोणाला हसवणे हे साध काम नाही, परंतु भाऊ यांच्यासाठी समोर बसलेल्या लाखो लोकांना हसवणे हे एकदम सोप झाल आहे. याच सर्व श्रेय जाते ते विजय निकम यांनी दिलेल्या मार्गदर्शनामुळे अन्यथा आपला भाऊनी कधीच अभिनय क्षेत्र सोडून दिले असते.

आपल्या पंचचा व्यवस्थित टायमिंग साधून अभिनय करण्याची एक  वेगळीच  कला भाऊ यांच्या मध्ये आहे.   चला हवा  येऊ द्या  या शोच्या सुर्वातीपासुन भाऊ कदम या कार्यक्रमाशी जोडले गेले आहेत.

निलेश साबळे ,भाऊ कदम ,कुशल बद्रिके,सागर करंडे, श्रेया बुगडे  यांच्यसारख्या विनोदी अभिनेत्यांना घेऊन चालत आलेला चला हवा येऊ द्या कार्यक्रम हा  महारष्ट्रातील घराघरात पोहचवन्यामागे भाऊ कदम याचं खूप मोठ योगदान आहे.एक पुरुष असून पुरुषापेक्षा  महिलांची भूमिका अधिक चांगल्या रितीन करण्याची कला भाऊ यांच्या मध्ये आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *