सोशल मिडिया क्वीन डान्सर गौतमी पाटील ही मागच्या काही दिवसांमध्ये चर्चेचा विषय बनली आहे. आधीच तिच्या डान्सची एवढी जबरदस्त क्रेझ असतांना दुसरीकडे तिचा खाजगी व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर टी तुफान चर्चेमध्ये आली होती.
सध्या गौतमी आपल्या कार्यक्रमामध्ये व्यस्त असली तरीही तिला तिच्या व्हायरल झालेल्या खाजगी व्हिडीओ बद्दल माहिती आहेच. याच व्हिडीओ बद्दल एका पत्रकाराने गौतमीला विचारले असता तिने मोठा खुलासा केला आहे.
पुण्यातील झालेल्या तिच्या कार्यक्रमानंतर गौतमीचा कपडे बदलतानाचा एक व्हिडीओ प्रसार माध्यमांवर व्हायरल झाला होता. ज्यानंतर सोशल मिडीयावर अनेक दिग्गज नेते, नायिका अभिनेते यांनी या व्हिडीओ वर प्रचंड संताप व्यक्त केला होता.
याबद्दल गौतमीशी बातचीत केली असता,गौतमी म्हणाली की, मी साध्याच यावर काहीही बोलण्यास तयार नाही. कारण माझी तशी मानसिक तयारी ही नाहीये. मी पोलिसांत तक्रार दिलेली आहे आणि पोलीस त्यांचे काम करत आहेत. गौतमीच्या या वक्तव्यावरून तिच्यावर असलेले प्रेशर सहज दिसून येत होते. पुढे बोलतांना गौतमी म्हणाली दुसरे काहीतरी विचार दादा. तो विषय नकोय.
गौतमीच्या त्या व्हायरल व्हिडीओबद्दल महिला आयोगाने देखील दाखल घेतली असून संबंधित व्यक्तीवर लवकरात लवकर मोठी कारवाई करण्याची मागणी केली आहे. पोलिसांनी सुद्धा तपासाला सुरवात करून दोन इंस्टाग्राम अकाऊंटवर कारवाई केली आहे. असं म्हटल जातंय की पहिल्यांदा तो व्हिडीओ याच अकाऊंटवर शेअर करण्यात आला होता.
दुसरीकडे, संबंधित व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांनी याची दखल घेतली. संबंधित व्हिडीओ शूट करणाऱ्यावर तत्काळ कारवाई करावी, असा आदेश रुपाली चाकणकरांनी दिला. याबाबत विचारलं असता गौतमी म्हणाली, “मला महिला आयोगबद्दल माहीत नव्हतं.त्यानंतर मला कळालं रुपालीताईंनी दखल घेतली आहे. त्यांनी ताबोडतोब कारवाई करण्याचे आदेश दिले, त्यामुळे बरं वाटलं.”
गौतमी पाटीलच्या ‘त्या’ व्हायरल व्हिडीओवर ज्येष्ठ कलावंत मंगला बनसोडेंची संतप्त प्रतिक्रिया
“गौतमी पाटीलचा व्हिडीओ व्हायरल झाला, हे ऐकून फार वाईट वाटलं. माझं मन नाराज झालं आहे. हा महाराष्ट्र जिजाऊंचा आहे, रमाबाईंचा आहे, हा महाराष्ट्र सावित्रीबाई फुलेंचा आहे. याच महाराष्ट्रात एका स्त्रीची विटंबना होते, हे चुकीचं आहे. गौतमी पाटील एक स्त्री आहे. स्त्रीनंतर ती कलावंत आहे, याचा विचार केला पाहिजे. कपडे काढतानाचे व्हिडीओ काढून ते व्हायरल करणं चुकीचं आहे. ती कलावंत जरी असली तरी आणि तिने याआधी चुका केल्या असल्या तरी तिने त्याबद्दल माफी मागितली आहे. पण आता सारखी सारखी ज्या पद्धतीने स्त्री जातीची विटंबना होत आहे, हे पाहून फार वाईट वाटतं,” असं मंगला बनसोडे-करवडीकर बोलताना म्हणाल्या.